हडपसर : महापालिका हद्दीत पुणे शहर आणि उपनगरात मोठे भूखंड आरक्षित आहेत. हडपसरमध्यहीे तसे काही भूखंड आरक्षित आहेत. त्यापैकी एका भूखंडावरती शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे,अशी लक्षवेधी सूचना हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी सभागृहात केली. शहरातील ससून रूग्णालयाच्या धर्तीवरच पुण्याच्या पूर्व भागात हडपसर येथे अद्यावत सुविधांनी युक्त असे शासकीय रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.तर,जी रुग्णालये सरकारी सवलती घेऊनही गरिबांच्या जीवाशी खेळ करत आहे, नियम पाळत नाहीत. त्यांच्यासाठी अधिक कडक कायदा करण्याची गरज आहे. असा सूचना आमदार तुपे यांनी सभागृहात लक्षवेद्वारे मांडल्या. यावेळी अधिक बोलताना आमदार चेतन तुपे म्हणाले की,” शहरातील रुग्णालयात दहा टक्के बेड हे निर्धनांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. सवलतीच्या दरात या रुग्णांना उपचार केले जातात. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाची तब्येत स्थिर होईपर्यंत तातडीने उपचार करून वैद्यकीय मदत द्यावी कोणतेही डीपोझिट आकारू नये”, अशा स्पष्ट सूचना आहेत. मनपा किंवा सरकारी जागा असेल अशा रुग्णालयांची यादी बनवून तातडीने हे नियम त्यांना लागू होतील हे निर्देश दिले गेले आहेत. परंतु यातही अधिक कडक कायदा करण्याची गरज आहे. जी रुग्णालये हे सर्व नियम पाळत आहे त्यांचे कौतुक आहे. मात्र सरकारी सवलती घेऊनही गरिबांच्या जीवाशी खेळ करत आहे, नियम पाळत नाही त्यांच्यासाठी अधिक कडक कायदा करण्याची गरज आहे. फायदे घेऊनही रुग्णांची हेळसांड करतात त्यांच्या रुग्णालयास लागू असलेल्या सर्व सवलती, योजना बंद कराव्यात. महानगरपालिकांच्या क्षेत्रात अनेक भूखंड राखीव आहे. अशा भूखंडावर राज्य सरकार पुढाकारने घेवून शासकीय रुग्णालये उभारावीत, असेही आमदार तुपे यांनी या लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. पुण्यात ससून, औंध मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. मात्र पूर्व भागात हडपसर मतदारसंघात पुणे मनपा अथवा राज्य सरकारचे कोणतेही अद्ययावत रुग्णालय नाही. हडपसर मध्ये जागा यासाठी आरक्षित आहे .त्याठिकाणी राज्य सरकारने रुग्णालय उभारावे. तसेच नोबेल हॉस्पिटल या हडपसर मधील रुग्णालयाचा अद्यापही मुख्यमंत्री सहायता निधीत समावेश करण्यात आलेला नाही. मागील वर्षभरापासून ही गोष्ट प्रलंबित आहे. ती कधी पूर्ण होणार हा मुद्दा उपस्थित केला. चेतन तुपे पाटील आमदार, हडपसर विधानसभा,