Manika Vishwakarma : १८ अॅागस्ट या दिवशी जयपूरमध्ये पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा मुकुट डोक्यावर चढविण्याचा मान राजस्थानची लेक मनिका विश्वकर्मा हिला मिळला आहे. तर उत्तर प्रदेशची तान्या शर्मा पहिली उपविजेती, हरियाणाची महक ढींगरा दुसरी उपविजेती आणि अमीषी कौशिक तिसरी उपविजेती ठरली आहे. या स्पर्धेत देशातून ४८ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. आता मनिका या वर्षाच्या अखेरीस थायलँडमध्ये होणाऱ्या 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार असून भारताचं प्रतिनिधित्व ती करणार आहे. यामुळे आता थायलँडमध्ये होणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेकडे सर्वांच्या नजारा लागलेल्या आहेत. या स्पर्धेत ती 130 देशांच्या सौंदर्यवतींना मनिका टक्कर देणार आहे. मिस युनिव्हर्स २०२५ झाल्यानंतर गतविजेती रिया सिंहाने आपला मुकूट मनिका विश्वकर्मा हिच्याकडे सोपविला. या स्पर्धेत ४८ स्पर्धकांमधून टॉप २० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा यातून ११ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यांना बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न विचारण्यात आला. काय होता प्रश्न? ‘मिस युनिव्हर्स इंडिया’च्या अंतिम फेरीत मनिकाला बुद्धमतेवर आधारित प्रश्न विचारण्यात आला. जर तुला महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि गरीब कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देणं यापैकी एक पर्याय निवडायचा असेल, तर तू कोणाला प्राधान्य देशील आणि का? उत्तर काय दिलं? या प्रश्नावर मनिकाने या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. महिलांना बऱ्याच काळापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. याचा परिणाम गरीब कुटुंबांवर होत आहे. जर मला निवड करायची असेल तर मी महिलांचं शिक्षण निवडेन. कारण शिक्षण केवळ एका व्यक्तीचंच नाही तर संपूर्ण पिढ्यांचं आणि समाजाचं भविष्य बदलू शकतं, असं उत्तर तिनं दिलं. #WATCH | Jaipur, Rajasthan: Miss Universe India, Manika Vishwakarma says, “… This feeling is so amazing. The journey has been amazing. I would like to thank my mentors, my teachers, my parents, my friends, and my family for everything. I aim to do my best to represent India at… pic.twitter.com/zHndCUB4Xl — ANI (@ANI) August 18, 2025 कोण आहे मनिका विश्वकर्मा? मनिका ही मूळची राजस्थानच्या श्रीगंगानगर इथली रहिवासी असून ती सध्या दिल्लीत राहते. ती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण घेत आहे. ती २३ वर्षांची आहे. ‘मिस युनिव्हर्स राजस्थान’ 2024 चा किताब पटकावून मनिकाने सौंदर्य स्पर्धेत पदार्पण केलं. ती एक क्लासिकल डान्सरही आहे. हेही वाचा : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ! सोन्यात तब्बल २१६० रु.घट ; जाणून घ्या आजचा भाव काय?