Umendra Limaye Post : साऊथ सिनेमाच्या देवाची भेट; उपेंद्र लिमयेचा आनंद गगणात मावेना! फोटो पाहा…

Umendra Limaye Post : मराठी कलाकार आता मराठी सिनेमांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. मराठी कलाकार बॅालिवूडमधील सिनेमांत दिसतात. साऊथ सिनेमातही मराठी कलाकारांनी आपल्या चाहता वर्ग तयार केला आहे. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, सचिन खेडेकर आणि काही कलाकारांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने साऊथ इंडस्ट्रीत त्यांच्या नावाचा दबदबा तयार केला आहे.
खरंतर साऊथचे सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. अनेक दर्जेदार विषय घेऊन साऊथ सिनेमा दरवेळी नवं काहीतरी आपल्या प्रेक्षकांना देत असतो. १४ अॅागस्टला साऊथ सिनेमाचा देव अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली सिनेमा रिलीज झाला. सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धुव्वा करत कमाईचा रेकॅार्ड केला आहे. या सिनेमातील रजनीकांतच्या पात्राची मोठी चर्चा झाली.
रजनीकांत यांचा चाहतावर्ग मोठा आहे. देशभरातील त्यांचे डाय हॅार्ट फॅन्स त्यांच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत असतात. कुली सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. रजनीकांत यांना भेटण्याचे अनेकांची इच्छा असते. पण सगळ्यांची इच्छा पूर्ण होतेच असं नाही.
सध्या सोशल मीडियावर सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत साऊथ सिनेमा इंडस्ट्रीचा देव अर्थात सर्वांचे लाडके रजनीकांत आणि मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील सर्वांचा लाडका आणि डॅशिंग अभिनेता उपेंद्र लिमये दिसत आहे. तर त्याचं झालंं असं उमेंद्र लिमयने रजनीकांत यांची भेट घेतली आहे. याबाबत स्वतः उपेंद्रने फेसबुक पोस्ट शेअर करून सांगितलं आहे. या पोस्टला त्याने आकर्षक कॅप्शनही दिलं आहे.





