Pune | पुढील आठवडाभर धुक्याची झालर
Updated On:

पुणे, – गेल्या दोन दिवसांत पुण्यात थंडी जाणवू लागली असून, पुढील आठवडाभर सकाळी धुक्याची झालर पसरण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
गेल्या दोन दिवसांत हवेत गारठा निर्माण झाला असून, थंडीची चाहूल आता लागली आहे.
वातावरण बदलामुळे दिवाळीनंतर थंडी पडण्याला सुरूवात झाली आहे.
गेले काही दिवस पहाटे गारवा जाणवत होता. मात्र गेल्या दोन दिवसांत दिवसभर हवेत गारवा जाणवत आहे. पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहून गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
टॅग्स:




