मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांकडून तब्बल ८४ कोटींचा दंड वसूल

मुंबई – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात मास्क वापरने सक्तीचे केले आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं सर्रास उल्लंघन करण्यात येत. मात्र अशा लोकांकडून मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये दंड आकारला आहे.
मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून मुंबई महापालिकेने मागील वर्षात तब्बल 84 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये बीएमसीने ६८ कोटी रुपये एवढी रक्कम सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांकडून तर मुंबई पोलिसांनी १५ कोटींहून अधिक दंड गोळा केला असून रेल्वेच्या तीनही लाईन्सवरून ५० लाखांवरून अधिक दंड जमा करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रातील रुग्णाचा रिकव्हरी रेट हा 92 टक्के एवढा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर 30,565 एवढे बेड उपलब्ध असून त्यातील 4,491 बेड सध्या भरलेले आहेत. त्याच बरोबर मुंबई महानगर पालिकेतील 16 प्रतिबंधक क्षेत्र आणि एकूण 389 इमारती या सील करण्यात आल्या आहेत .
मुंबईत आज गुरुवारी 18,466 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ओमायक्रॉनचे एकूण ७५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे मुंबईचे असून ठाण्यातील 9, तर 8 रुग्ण पुणे, 5 रुग्ण पनवेल आणि कोल्हापूर, नागपूरमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 2 आणि उल्हासनगर, सातारा अमरावती आणि नवी मुंबई मधून प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत.





