Saiara Success Party : जंगी सेलिब्रेशन! सैयाराच्या टीमकडून सक्सेस पार्टी; अहान-अनितचा अनोखा अंदाज, मोहित सुरीने कापला केक, VIDEO व्हायरल…

Saiara Success Party : बॅालिवूडमधील एका रोमँटिक सिनेमाने या वर्षी ‘छावा’नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाचा बहुमान मिळवला आहे. रिलीज झाल्यापासूनच सैयारा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाने जगभरात ५०० कोंटीपेक्षा जास्त कमाई केली असून, देशभरात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. यामुळे सैयाराच्या सिनेमातील कलाकारांसाठी सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या सक्सेस पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या सक्सेस पार्टीत सिनेमातील अहान पांडे आणि अनित पद्ढा मुख्य जोडी एन्जॅाय करताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सिनेमाचे दिग्दर्शक मोहित सुरी केक कापताना दिसत आहेत. तर अहान आणि अनित कोणालातरी मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सैयारा सिनेमाचं टायटल ट्रक गाणं वाजत आहे. या टायटल ट्रॅकवर प्रत्येकजण एन्जॅाय करत नाचताना दिसत आहे. अहान आणि अनित या दोघांनी ही सक्सेस पार्टी खूप एन्जॅाय केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सैयारा सिनेमाला बॅाक्स अॅाफिसवर येऊन २४ दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. लवकरच आतापर्यंत समोर आलेल्या बॅाक्स अॅाफिसच्या आकड्यांनुसार हा सिनेमा ५०० कोटींचीपेक्षा अधिकची कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. छावा या सनेमानंतर आता या वर्षीच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व सिनेमांना मागे टाकत सैयाराने आणखी एक नवा रेकॅार्ड रचत कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थान पटकावलं आहे.
हेही वाचा : अगोदर मोदींना आणि आता ब्राझीलच्या पंतप्रधानांना पुतीनचा फोन ; नेमकं काय चाललंय पुतिनच्या मनात ?





