पुणे | एसपीजची चोखंदळ खवय्यांसाठी मेजवानी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सन १९९४ मध्ये संपूर्णपणे बिर्याणीला वाहून घेतलेले एसपीज् बिर्याणी हाउस हे रेस्टॉरंट सुरू झाले. एका सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या ध्येयवेड्या माणसाच्या कल्पनेतून याची सुरुवात झाली. १० मे रोजी एसपीजचा ३० वा वर्धापनदिन पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेतारका अमृता खानविलकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, दिलीप जाधव, जवाहर चोरगे, चंद्रलेखा चोरगे, पुत्र हर्षवर्धन चोरगे, कन्या ऋतुजा साठे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
दरवर्षी बिर्याणीत काहीतरी नवीन देऊ पाहणाऱ्या एसपीजने यंदा खास चोखंदळ खवय्यांसाठी वेगवेगळ्या डिशची मेजवानी सादर केली आहे. मलमल मटण दम बिर्याणी, मलमल मटण पुलाव आणि लजीज खिमा. सर्वोत्तम जिन्नस वापरून केलेली ही बिर्याणी अत्यंत प्रीमियम क्वॉलिटीची असून, बिर्याणीप्रेमींना समाधान देणारी आहे,
तसेच कमी तिखट असल्याने अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या बिर्याणीचा स्वाद आणि आनंद घेऊ शकतील. मात्र, या नवीन रेसिपींचा स्वाद घेण्यासाठी एक दिवस आधी बुकिंग करावे, तसेच बिर्याणी १ किलो ते ५ किलो या लिमिटेड एडिशनमध्येच ती उपलब्ध असेल.
तीस वर्षांत अगदी तीसपेक्षा अधिक बिर्याणींची विविधता येथे आढळते. जगभरच्या बिर्याणी ते ही एकाच ठिकाणी ही अभिनव कल्पना त्यांनी प्रत्यक्षात एसपीजमध्ये उतरवली. जवळपास तीन दशकांचा हा प्रवास. थकवणारा नव्हता; पण कसोटी पाहणारा मात्र नक्कीच होता.
मात्र, याच कसोटीच्या काळातही सचोटीने प्रयत्न करणारे जवाहर चोरगे आणि त्यांना खंबीरतेने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी चंद्रलेखा चोरगे यांनी हे यशस्वितेचे शिखर गाठले आहे. आता हाच वारसा हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले त्यांचे पुत्र हर्षवर्धन चोरगे अधिक कल्पकतेने आणि सक्षमतेने पुढे नेत आहेत.
बिर्याणीसाठी अस्सल जिन्नस आणि जगभरच्या बिर्याणींची शैली याचा सुरेख संगम एसपीजने साधून त्याला थोडा खास पुणेरी टच दिला. म्हणूनच आज एसपीजच्या बिर्याणी सर्वांच्या आवडत आहेत.
अस्सल चवीने आणि जगभरच्या बिर्याणींतून वेगळेपण जपणाऱ्या आणि विविध ट्रेंड सेट करणाऱ्या एसपीज बिर्याणी खवय्यांसाठी आणखी एक विशेष ट्रेंड सेट केला तो म्हणजे बिर्याणी फेस्टिव्हल. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बिर्याणी फेस्टिव्हल साजरा करणारे एसपीज् हे पहिले आणि एकमेवच आहे. उत्कृष्ट सर्व्हिस आणि पार्किंगची सोयही असल्याने प्रत्येकाने इथे येऊन लज्जतदार बिर्याणींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चोरगे यांनी केले आहे.
पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद
राणी मटण दम बिर्याणी, महाराजा मटण दम बिर्याणी, बलुची, पर्शियन, कराची, लखनवी, मराठा मटण/चिकन दम बिर्याणी अशी एक से बढ़कर एक बिर्याणींची फौज ग्राहकांच्या दिमतीस असते. पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त बॅण्ड अॅम्बॅसेडर आमिर खान यांच्या हस्ते त्यांच्याच नावाची खास आमिर खान बिर्याणी लॉन्च केली. आजतागायत् पुणेकर खवय्यांनी त्या बिर्याणीस भरभरून प्रतिसाद दिला.





