चाहत्याने थेट सामंथाला केलं प्रोपज; अभिनेत्रीनेही दिले खास उत्तर…

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धूलिपाला यांचा ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा पार पडला. त्यांचे साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. मात्र यामुळे सामंथाचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी सामंथाबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशातच आता एका चाहत्याने सामंथाला थेट लग्नाची मागणी घातली आहे. यावर सामंथाना देखील उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एका सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सरने सामंथाला लग्नासाठी प्रपोज केले आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला एआयने तयार केले जिमही दिसते आहे . त्यासोबत त्याने लिहिले आहे की, ‘मी माझी बॅग पॅक करुन सामंथाच्या घराकडे निघत आहे. मला तिला सांगायचे आहे की तिला काळजी करण्याची गरज नाही. कारण मी नेहमीच तिच्यासोबत राहिन. मी लग्नासाठी तयार आहे, मला फक्त २ वर्ष दे म्हणजे मी चांगले कमवीन. ” व्हिडिओमध्ये चाहता सामंथाला गुडघ्यावर बसून प्रपोजही करतानाही दिसत आहे. Samantha Ruth Prabhu |
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सामंथाने देखील ‘बॅकग्राउंडला जीम दिसत असल्यामुळे मी होकार देते.’ समांथाची ही कमेंट पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत. सामंथाने हे विनोद आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतल्याने चाहते खुश आहेत. Samantha Ruth Prabhu |
दरम्यान, सामंथा रुथ प्रभूचे २०१७ मध्ये तिचे नागा चैतन्यशी लग्न झाले होते, परंतु २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.यानंतर सामंथाला तब्येतीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या एंगेजमेंटनंतरही चाहत्यांनी सामंथाला प्रोत्साहन दिले आहे.
हेही वाचा:
हिंडेनबर्गच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा मोठा हल्लाबोल ; म्हणाले,”आता समजले की..”





