Pimpri : भक्ती शक्ती उड्डाणपूलावर डंपर उलटला
Updated On:

पिंपरी : वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे डंपर उलटून अपघात झाला आहे. ही घटना भक्ती शक्ती उड्डाणपूल येथे शनिवारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मुंबई आणि पुण्याला जोडणारा भक्ती शक्ती पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
भक्ती शक्ती उड्डाणपूल येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे डंपर उलटून अपघात झाला . या अपघातामुळे मुंबई आणि पुण्याला जोडणारा भक्ती शक्ती पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
घटनास्थळी अग्निशामनदल, निगडी पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. डंपर उलटल्याने उड्डाणपूलावर वाळू सांडली होती. वाहने घसरू नयेत म्हणून ती वाळूही झाडून बाजूला काढण्यात आली. अपघातामुळे मार्ग बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.





