Koynanagar: कोयना धरणाच्याल साठवण क्षमतेच्या ३.७७ टक्के पाण्याची घट
Koynanagar बाष्पीभवनामुळे १ जून ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सरासरी ०.०२७२ टीएमसी, म्हणजेच सुमारे २७.२ दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले. ही आकडेवारी १४६ दिवसांची आहे. त्यामुळे ही घट केवळ ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे झाली, असा निष्कर्ष काढता येत नाही. यात पूर्वेकडील सिंचन व पश्चिमेकडील वीज प्रकल्पाचा समावेश आहे.

Koynanagar: केवळ बाष्पीभवनामुळे अवघ्या १४६ दिवसांत कोयना धरणातील ३.९७१८ टीएमसी पाण्याचे नुकसान झाले आहे. धरणाच्या १०५.२५ टीएमसी साठवण क्षमतेच्या तुलनेत ही घट ३.७७ टक्के आहे. वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी होणाऱ्या पाणीवापरापेक्षा वेगळी ही नैसर्गिक पाणीघट जलसाठ्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने लक्षवेधी ठरली आहे.
बाष्पीभवनामुळे १ जून ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सरासरी ०.०२७२ टीएमसी, म्हणजेच सुमारे २७.२ दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले. ही आकडेवारी १४६ दिवसांची आहे. त्यामुळे ही घट केवळ ऑक्टोबरमधील वाढत्या उष्णतेमुळे झाली, असा निष्कर्ष काढता येत नाही. यात पूर्वेकडील सिंचन व पश्चिमेकडील वीज प्रकल्पाचा समावेश आहे.
कोयना धरण हे महाराष्ट्राच्या वीजनिर्मिती आणि सिंचन व्यवस्थेतील महत्त्वाचे जलस्रोत आहे. पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वळविले जाणारे पाणी आणि पूर्वेकडील सिंचन प्रकल्पांसाठी होणारा वापर यांच्याबरोबरच बाष्पीभवनातून होणारी घटही जलसाठ्याच्या नियोजनात महत्त्वाची ठरते. या बाबींचा विचार करून उपलब्ध जलसाठ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक बनले आहे.
कोयना धरणातील प्रत्येक टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे आहे. त्यामुळे बाष्पीभवनातून होणारी पाणीघट लक्षात घेऊन जलसाठ्याचे प्रभावी नियोजन आणि वीजनिर्मिती व सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.





