Rohit Pawar : “इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार”; आंदोलकांवर लाठीचार्ज होताच संतापले रोहित पवार
Rohit Pawar: 'सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा'

Rohit Pawar : दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे.आज संसदेकडे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याने राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
मात्र जंतरमंतरवर संसदेचा मोर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलक आणि आरपीएफ जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्व घडामोडीनंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट (Rohit Pawar)
रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता… इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध!”
आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता… इंग्रजांनाही लाजवणारं हे क्रूर आणि निष्ठूर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकूमशाही सरकारचा तीव्र निषेध!
दिल्ली… pic.twitter.com/999cXAYMdR
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2026
आता तरी शहाणं व्हावं… (Rohit Pawar)
पुढे ते म्हणाले, “दिल्लीमध्ये संसदेवर निघालेला विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. मात्र लोकशाहीमध्ये सर्वात शक्तिशाली रस्त्यावर उतरलेला सर्वसामान्य माणूस असतो हे आज सरकारच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. २० दिवस अन्नत्याग करून देखील शासनाने या आंदोलनाची दखल तर घेतली नाहीच मात्र सोनम वांगचूक यांना हुकुमशाही पद्धतीने उचलण्यात आले. Rohit Pawar
आपली चूक सरकार मान्य करत नाहीच मात्र उलट लोकशाही पद्धतीने आंदोलन देखील करून दिले जात नाही. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलनच त्यांच्या शेवटाची सुरवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
दिल्लीत छावणीचे स्वरूप (Rohit Pawar)
दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ ही पाच महत्त्वाची मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून इंटरनेट नेटवर्क ठप्प करण्यात आले आहे.
जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) तसेच निमलष्करी दलाचे मोठे पथक तैनात करण्यात आले आहे. संभाव्य जमाव नियंत्रणासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रणासाठी वापरली जाणारी ‘वज्र’ वाहनेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले असून, काही ठिकाणचे बॅरिकेड्सही हटवण्यात आले आहेत. Rohit Pawar
हेही वाचा :
Salman Khan : सलमान खानचा ‘तो’ व्हिडिओ पाहताच चाहते चिंतेत; स्वत: पोस्ट करत म्हणाला…





