तेहरान – अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार स्थापन करावे, अशी मागणी इराणने केली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबजादेह यांनी ही अपेक्षा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये स्थापन होओणाऱ्या भावी सरकारमध्ये अफगाणिस्तानातील सर्व लोकांचे प्रतिनिधी सहभागी व्हायला हवेत, असे ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले असल्याचे वृत्त शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले आहे.
अफगाणिस्तामधील सर्व घडोमडींवर इराणकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. अफगाणिस्तानमधील सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवावेत, असाही इराणचा आग्रह आहे, असे इराण सरकारचे प्रवक्ते खातिबजादेह म्हणाले. अफगाणिस्तानातील सर्व गटांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून चर्चेच्या प्रक्रियेला सुरुवात करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी हे गुरुवारी इराणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामध्ये अफगाणिस्तानबाबत चर्चा केली जाईल, असेही खातिबजादेह यांनी सांगितले.