Sunny Deol : शेवटची आठवण….ट्रेलर लॅान्च सोहळ्यावेळी इमोशनल झाला सनी देओल; राजकुमार संतोषी धर्मेंद्र यांच्याबद्दल म्हणाले…
Sunny Deol : राजकुमार संतोषी हे सांगताना असताना सनी देओल वडिलांच्या आठवणीत भावूक झाला.

Sunny Deol : आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित ‘बटवारा १९४७’ या सिनेमाचा ट्रेलर लॅान्ज २८ जुलै रोजी मुंबईत पार पडला. या ट्रेलर लॅान्ज सोहळ्याला सिनेमातील प्रमुख कलाकार सनी देओल, शबाना आझमी, जावेद अख्तर, दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. मात्र, या कार्यक्रमात घडलेल्या एका भावनिक प्रसंगाने उपस्थित असणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी संबंधित एक खास आठवण सांगितली. ते म्हणाले की, ‘बटवारा १९४७’ हा सिनेमा धर्मेंद्र यांनी त्यांच्या निधनापूर्वी पाहिलेल्या शेवटच्या सिनेमांपैकी एक होता. सिनेमाची कथा ऐकताना धर्मेंद्र इतके भावूक झाले होते की त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. राजकुमार संतोषी हे सांगताना असताना सनी देओल वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. हाच क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन असे लक्षात येते की सनीला वेळोवेळी वडील धर्मेंद्र यांची आठवण येते.
What could be a more beautiful relationship than that of a father and son🥹🥹💔💔
“No matter how big a child gets, the loss of parents leaves a void that no one else can fill.”#SunnyDeol gets emotional remembering Dharmendra ji during the trailer launch of #Batwara1947. pic.twitter.com/mgE8G7zA6y— NK (@narendr42076873) July 29, 2026
नेमकं काय म्हणाले राजकुमार संतोषी?
राजकुमार संतोषी म्हणाले, “धर्मेंद्रजींनी या सिनेमाला मनापासून आशीर्वाद दिला होता. कथा ऐकल्यानंतर ते खूप भावूक झाले. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितले, ‘राज, हा सिनेमा मोठा हिट ठरेल. तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट काम केले आहे.” वडिलांबद्दलच्या या आठवणी ऐकताच सनी देओल भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि काही क्षण कार्यक्रमातील वातावरणही भावनांनी भारावून गेले. उपस्थितांनी हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी असल्याचे सांगितले.
राजकुमार संतोषी यांचा ‘बटवारा १९४७’ हा सिनेमा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यांनी याअगोदर अनेक सिनेमांचे दिग्दर्शक केले असून, या सिनेमातून त्यांनी एका वेगळ्या विषयाला हात घातला आहे. या सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असली तरी माणुसकी, संघर्ष, धैर्य आणि नातेसंबंधांची ताकद अधोरेखित करणारी भावनिक कथा सिनेमात मांडण्यात आली आहे.
१४ अॅागस्टला होणार प्रदर्शित
या सिनेमात सनी देओलसोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल, अली फजल आणि अभिमन्यू सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातून तब्बल ८ वर्षांनी अभिनेत्री प्रीती झिंटाने बॅालिवूडमध्ये कमबॅक केले आहे. सिनेमाचे संगीत ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांनी दिले असून गीते जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. दमदार कलाकार, प्रभावी कथा आणि भावनिक मांडणीमुळे ‘बटवारा १९४७’ची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. १४ ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटर्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
Salman Khan : आसाममध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान





