पालघरमध्ये अन्नातून विषबाधा झालेल्या प्रकरणाची चौकशी करावी; खासदार हेमंत सावरा यांची मागणी

पालघर : पालघर जिल्ह्यातील ३३ आश्रम शाळांमध्ये २९५ पुरुष व ३६८ विद्यार्थिनींना काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार हेमंत सावरा केली असून यासंदर्भात आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांची भेट घेऊन मागणी पत्राचे सादर केले आहे.
मागील आठवड्यात रात्रीचे जेवण झाल्यानंतर मध्यरात्री काही शाळातील विद्यार्थीनींनी मळमळ, उलटी आणि पोटदुखीची तक्रार केली होती. या संदर्भात प्रशासनाने तातडीने पाऊले उचलताना संबंधित विद्यार्थीनींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सातत्याने तक्रारीचा ओघ वाढत होता. सुमारे ३३ शाळेतील विद्यार्थीना या अन्नाचा त्रास झाला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या डहाणू प्रकल्पाअंतर्गत या आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शाळा आहेत. पालघर येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून या आश्रम शाळांना अन्न पुरवठा करण्यात येते. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यानी या संदर्भातील आढावा घेतला होता. उपचारानंतर विद्यार्थ्यांची स्थिती पूर्वपदावर आली आहे.
पाच ऑगस्ट रोजी ही घटना घटना घडली. यामुळे अनेक विद्यार्थाना यामुळे त्रास झाला. अशा घटना रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिक आमदारांनी केली होती. यामुळेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांच्यकडे केली असल्याचे खासदार हेमंत सावरा यांनी सांगितले.





