बारामती – शहरातील इंदापूर रिंग रोडवर (indapur ring road) प्रशासकीय भवनाजवळ झालेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (accident fir) शहरातील रिंग रोडवर प्रशासकीय भवनाजवळ दि. (७) रोजी हायवा टिप्परने धडक दिल्याने तेजस विजय कासवे याचा मृत्यू झाला. त्यानंतर सहा दिवसाच्या कालावधीनंतर टाटा कंपणीचा हायवा टिपर नंबर (एम.एच 42. बी. एफ 2941) वरील अज्ञात चालक. वाहनचालक विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक आप्पासो कोकरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. (pune gramin) राधीका विजय कासवे व त्यांचा मुलगा तेजस विजय कासवे दोन्ही (रा. क-हावागज ता. बारामती जि.पुणे) सध्या रा. तांदुळवाडीरोड कृष्णाई लॉन्सजवळ बारामती ता. बारामती जि. पुणे) हे होन्डा कंपणीची अॅक्टीव्हा स्कुटी मोटारसायकल नंबर (एम. एच. 42, बी. के 9795) वरून बारामती हॉस्पीटल बाजुकडुन रोडने बारामती बाजुकडे घरी जात असताना बारामती रिंगरोड क्रॉस करत असताना टाटा कंपणीचा हायवा टिपर वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात दुचाकीस धडक दिली. या घटनेत तेजस विजय कासवे याचा मृत्यू झाला. तर त्याची आई राधिका या गंभीर जखमी झाल्या. दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ए एस आय, व्ही. व्ही. मोरे करीत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी निघालेला युवक तेजस विजय कासवे याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर बारामती शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलंकर, तसेच जगदीश कोळेकर, ॲड.ज्ञानेश्वर माने यांनी याबाबत आवाज उठवला. कारवाईची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.