गर्दी जमल्याची अफवा पसरविणाऱ्या एकावर गुन्हा दाखल
Updated On:

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील आश्वी येथील एका युवकाने खोडसाळपणे दुसऱ्या तरुणाच्या नावाने नियंत्रण कक्षात आश्वी येथे मोठी गर्दी जमल्याची खोटी माहिती मोबाईलवरून दिली.
प्रशासनाने त्याची खातरजमा केली असता, ही माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्याने संबंधित तरुणाविरोधात आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बंडू लकारे असे अफवा पसरविणाऱ्याचे नाव आहे.
गुरुवारी (दि. 7) रात्री नऊ वाजेदरम्यान लकारे याने आश्वी खुर्द येथील शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती ठाणे अंमलदार यांना दूरध्वनीवर दिली. मात्र ही माहिती खोटी निघाली. त्यामुळे पोलिसांनी लकारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.





