‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधील अभिनेत्यावर गुन्हा दाखल ! हॉटेलमालकाला 29 लाखांना चुना लावल्याचा आरोप

मुंबई – अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटाने बॉलिवूडची चाल ढाल बदलून टाकली. गॅंगबाजी आणि गुन्हेगारीवर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला होता की यातील प्रत्येक कॅरेक्टर सर्वांच्या परिचयात राहिले. याच चित्रपटातील डेफिनेटची भूमिका साकारणारा झिशान कादरी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र तो एखाद्या चित्रपटामुळे नाही तर खऱ्या आयुष्यात केलेल्या गुन्हामुळे चर्चेत आल्याचे समजते.झिशानवर एका हॉटेलचे पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रांचीमध्ये झीशान कादरीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांचीच्या हिंदपिरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. एका हॉटेल चालकाने झीशानविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल एव्हीएन ग्रँडचे संचालक विशाल शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची सुमारे २९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. झिशानने हॉटेलचे थकलेले बिल न भरल्यामुळे ही तक्रार दाखल केल्याचे आता समोर आले आले आहे.
या आधी देखील झाला आहे झिशानवर आरोप
याआधीही झीशानवर चोरी आणि फसवणुकीचे आरोप आहेत. एका महिलेने त्याच्यावर ३८ लाख रुपयांची ऑडी-६ कार चोरून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. झीशानने जीवे मारण्याचीही धमकी दिल्याचेही महिलेने सांगितले होते. या प्रकरणात जीशानने ती महिला खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. हे केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी करत असल्याचे झिशान त्यावेळी म्हंटले होते.





