Ram Gopal Varma : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सत्या, रंगीला आणि कंपनी यांसारखे सुपरहीट चित्रपट काढणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गोपाल वर्मा यांनी अलिकडे सोशल मिडीयावर केलेल्या एका पोस्टमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
टीडीपी पार्टीचे नेते रामलिंगम यांनी प्रकाशम जिल्ह्यातील मद्दिपडू पोलिस ठाण्यात रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या वर आरोप आहे की त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्यांचा मुलगा लोकेश आणि सून ब्राह्मिनी सह परिवाराला टार्गेट करीत अपमानजनक मजकूर सोशल मिडीयावर शेअर केला.
रामलिंगम यांनी रामगोपाल वर्मा यांच्या पोस्टमुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे उपमुख्यमंत्री तसेच कुटुंबियांची बदनामी झाली आहे असा आरोप केला आहे. प्रकाशम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक ए.आर.दामोदर यांनी या प्रकरणात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.





