पुणे जिल्हा: कारेगाव येथे व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवत 35 हजार रुपये लुटले, तक्रार दाखल

रांजणगाव: कारेगाव तालुका शिरूर येथे मनी ट्रान्सफर व्यावसायिकाला दमदाटी करून त्याच्याकडून रोख रक्कम घेऊन गेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी माहिती दिली.
याबाबत सोनेसांगवी तालुका शिरूर येथील ज्ञानेश्वर कान्हू डांगे (वय 21 वर्षे) पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. डांगे यांचा कारेगाव येथे मनी ट्रान्सफरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा सात वाजता सुमारास कारेगाव तालुका शिरूर येथील प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार, वैभव गाडे ट्रान्सफरिंगचे दुकानांमध्ये येऊन फिर्यादीस व फिर्यादीचा चुलत भाऊ ऋषिकेश हिरामण डांगे याला मोठमोठ्याने शिवीगाळ दमदाटी केली.
त्यावेळी आरोपी वैभव गाडे याने दुकानाचे शटर खाली घेतल्यानंतर आरोपी बच्चा नवले व आयर्न नवलेने त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. आयर्न नवले नेत्याच्याकडील कोयत्याने दरवाज्याची काच व फिंगर प्रिंट घेण्याचे डिवाइस फोडून नुकसान केले व बच्चा नवले याने फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील काउंटरच्या गल्ल्यातील 35 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून दहशत माजवत पळून नेले आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ महादेव तिडके हे करीत आहेत





