धक्कादायक! स्वारगेट- महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी
Updated On:

पाचगणी – स्वारगेट ते महाबळेश्वर बसमध्ये बंदुकीची गोळी सापडल्याची घटना समोर आली आहे. बसमधील प्रवाशांना ही गोळी दिसून आल्यानंतर त्यांनी वाहकाच्या ही बाब निदर्शानास आणून दिली. त्यानंतर वाहक धोत्रे यांनी पाचगणी पोलीसांना संपर्क करून माहिती दिली. पोलीसांनी गोळी जप्त केली आहे.
एसटीची स्वारगेट ते महाबळेश्वर बस (एमएच १४ बीटी १२२६) पाचगणीबस स्थानकावर गुरुवारी पोहचली असताना गाडीमध्ये बंदुकीच्या गोळीसदृश्य वस्तू आहे, असे वाहक धोत्रे यांना प्रवाशांनी सांगितले. तेव्हा वाहक धोत्रे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यावर पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक फौजदार माने, हवालदार बाबर, फरांदे , निलेश माने, साठे, जगताप यांनी घटनास्थळी जाऊन ती गोळी जप्त केली. पुढील तपास सुरु आहे.




