कामचुकार कंत्राटदारांना दणका; मंत्री आशिष शेलारांनी दिले निर्देश

Ashish Shelar | मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट होते. मात्र काही कंत्राटदाराकडून नियोजन होत नसल्याने कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. ही बाब बुधवारी मुंबई उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांना रस्ते-काँक्रीटीकरणाच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आली.
यावेळी नागरिकांनी अपूर्ण रस्तेकामांचा पाढाच वाचला. कामचुकार कंत्राटदारांवर दंड आकारण्यात यावा, असे निर्देश शेलार यांनी महापालिकेला दिले.
आशिष शेलार यांनी पूर्व उपनगरातील एन वॉर्डमधील घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी गेले सहा महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट-काँक्रीट टाकल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्थानिकांनी तक्रार केली. यावेळी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. नागरिकांचा रोष पाहता, तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना शेलार यांनी केल्या.
रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यावर ओतणे २० मे २०२५पासून बंद करण्यात आले आहे. २० मे २०२५ नंतर रस्ते-काँक्रीटीकरणाचे कोणतेही नवे काम सुरू करू नये. सुरू असलेली सर्व कामे ३१ मे २०२५ पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत. Ashish Shelar |
सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण केल्यानंतर रस्त्याचा काही भाग अपूर्ण असेल, तर मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने ते काम पूर्ण करून रस्ते वाहतूक योग्य करावेत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. Ashish Shelar |
हेही वाचा:





