सिनेसृष्टीचे अष्टपैलू अभिनेते ‘निळू फुले’ यांचा बायोपिक येतोय..; ‘या’ दिवशी होणार चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई – नाट्यअभिनेते, लोकनाट्यकार, खलनायक, चरित्रनायक आणि सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच, सर्वांचे लाडके दिवंगत अभिनेते ‘निळू फुले’, ‘निळूभाऊ’ यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
निळू फुले यांनी मराठीतच न्हवे तर बॉलिवूडमध्ये देखील आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. दरम्यान, निळू फुले यांचा हा बायोपिक बॉलिवूडमध्ये येणार असून, निर्माता कुमार तौरानी हे या बायोपिकवर काम करतील. या वर्षीच या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
View this post on Instagram
निळू फुले यांचा जन्म 25 जुलै 1931 रोजी पुणे येथे झाला. अत्यंत सामान्य कुंटुंबात जन्मलेले फुले अभिनय आणि सेवादल यामुळे प्रसिद्ध झाले. निळु फुलेंनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात मराठी नाटक ‘अकलेच्या कांद्याची गोष्ट’ पासून केली होती. तर ‘एक गाव बारा भानगडी’ पासून त्यांच्या चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात केली होती.
दरम्यान, या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच इतर कालाकरांच्या निवडी देखील व्हायच्या आहेत. 250 हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात निळू फुलेंनी अभिनय केला आहे.





