गुगलकडून एक मोठे अपडेट! आता टीव्हीवरही पाहू शकता ‘YouTube’ शॉर्ट्स !

जर तुम्ही तक्रार करत असाल की तुम्हाला तुमच्या टीव्हीवर यु ट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) बघायला मिळत नाहीत, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवरही यू-ट्यूब शॉर्ट्स चे व्हिडिओ पाहू शकाल. गुगलने याचे जागतिक अपडेट जारी केले आहे. यु ट्यूब स्मार्ट टीव्ही अॅपसह, तुम्ही उभ्या शैलीत म्हणजेच व्हर्टिकल स्टाईलमध्ये व्हिडिओ पाहू शकाल.
तुम्हाला यु ट्यूब शॉर्ट्सच्या टीव्ही अॅपवर एक मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. मोबाईल अॅपमध्ये फक्त 60 सेकंदांचे व्हिडिओ पाहण्याची संधी आहे. यु ट्यूबने टीव्हीसाठी यु ट्यूब शॉर्ट्स ऑप्टिमाइझ केले आहे.
यु ट्यूबने एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही अॅपची उजवी बाजू खास डिझाइन केली आहे जेणेकरून वापरकर्ते व्हर्टिकल स्टाईलमध्ये आरामात व्हिडिओ पाहू शकतील. आम्हाला खात्री आहे की नवीन अपडेटनंतर तुमचा टीव्ही अनुभव चांगला असेल.
2019 मध्ये किंवा नंतरच्या स्मार्ट टीव्हीसाठी यु ट्यूब शॉर्ट्सचे अपडेट येत्या काही आठवड्यांमध्ये रोल आउट केले जाईल. तुम्ही तुमच्या टीव्हीच्या रिमोटने यु ट्यूब शॉर्ट्सचे व्हिडिओ सुरू-थांबवू शकाल आणि प्ले-पॉज करू शकाल.
Fake website : काही सेकंदात ओळखली जाईल बनावट वेबसाईट, जाणून घ्या…5 सोप्या पद्धती
तुमच्या माहितीसाठी, यु ट्यूब शॉर्ट्सच्या रोजच्या व्ह्यूजने 30 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. लहान व्हिडिओ फॉरमॅटमध्ये यु ट्यूब हे पहिले नाही ज्याने टीव्हीसाठी असे अपडेट जारी केले आहे. यापूर्वी टिकटॉकने देखील टीव्हीसाठी अपडेट जारी केले होते.





