#MahaBudget2023 : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीवरील वाढीव सेवाशुल्क रद्द

मुंबई – मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये 665.50 रद्द करुन जुन्या दराने 250 रुपयेच आकारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
मुंबईतील म्हाडाप्रश्नी सभागृहात आज चर्चा झाली. आमदार अमन पेटल, आशिष शेलार, अजय चौधरी यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार केला जाईल, असेही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गिरगाव, वरळी आणि लोअर परळ भागातील 20 हजार कुटुंबियांना थकीत घरभाडे, दंड आणि करासहित रक्कमेची नोटीस पाठवण्यात आली आहे. या ठिकाणी मध्यमवर्गीय मराठी बांधव राहतात. त्यामुळे त्यांना या नोटीशीतून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार अमन पटेल यांनी केली होती.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/my-statement-is-only-for-one-group-sanjay-rauts-written-reply-to-the-infringement-notice/
त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गिरगाव, वरळी आणि लोअर परळ भागातील 483 गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सक्तीने वसुली होत असले तर त्यावर कारवाई केली जाईल. तसंच, वाढलेली भाडेवाड मागे घेत जुन्या दराप्रमाणेच भाडे आकारले जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. तसेच, म्हाडाच्या अनेक इमारतींच्या पुनर्वसनाची गरज आहे. या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास प्रस्तावांना गती देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.





