Joe Biden Security Threat : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक ; ‘नो फ्लाय झोन’ घुसले अज्ञात विमान

Joe Biden Security Threat: इस्रायल-हमास युद्धादरम्यान, जगभरातील सुरक्षा संस्था त्यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेबाबत एक मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. डेलावेअरमध्ये नागरी विमानांसाठी नो फ्लाय झोन असतानाही बिडेनच्या घराजवळ अचानक एक विमान घुसल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या घराजवळ नागरी विमानाने प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी केली तेव्हा बिडेन त्यांच्या विल्मिंग्टन घरी उपस्थित होते. युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसचे संपर्क प्रमुख अँथनी गुग्लिल्मी यांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे.
पुढे बोलताना गुग्लिल्मी म्हणाले की, नागरी विमानाने शनिवारी (२८ ऑक्टोबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी २ नंतर विल्मिंग्टनच्या उत्तरेकडील प्रतिबंधित हवाई हद्दीत प्रवेश केला. ते म्हणाले की, लढाऊ विमानांच्या मदतीने नागरी विमानांना खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आले आणि जवळच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
दरम्यान,, अंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या सुरु असणाऱ्या इस्राइय-हमास युद्धाचे पडसाद हे संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत. त्यातच या युद्धावर अमेरिकेची भूमिका ही अत्यंत महत्वाची मनाली जात आहे. त्यामुळे जो बायडेन यांच्या सुरक्षेतील ही चूक मोठी असल्याचे बोलले जात आहे.
त्यासोबतच नागरी विमानांच्या या घुसखोरीबाबत अद्याप कोणताही धोका समोर आलेला नाही. मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीक्रेट सर्व्हिसचे एजंट आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. विमानाच्या वैमानिकाची चौकशी सुरू करण्यात आली असून, विमान कोणत्या उद्देशाने उड्डाण केले होते, याचा शोध घेतला जात आहे. त्याची वेळ आणि इतर नमुनेही तपासले जात आहेत. दरम्यान, फॉक्स न्यूजने गुग्लिल्मीच्या हवाल्याने म्हटले आहे की, या घटनेचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासावर कोणताही परिणाम झाला नाही.





