११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; फडणवीसांसह अनेक राजकीय नेत्यांचा योग दिनी सहभाग

International Yoga Day | जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शेकडो वारकऱ्यांबरोबर योग दिन साजरा केला आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
तर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम धंतोली येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मंत्री नितिन गडकरी यांनी शेकडो नागरिकांबरोबर योगासनं केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला आणि योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गडकरी यांनी सांगितले की, “नियमितपणे योगासने करणे याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा उपयोग होतो. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योगशास्त्र आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आज संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर योगाचा प्रसार झाला आहे आणि लोक योगासने करत आहेत. ही आपल्यासाठी खूप मोठी बाब आहे. मी सर्वांना आवाहन करेन की, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज नियमितपणे योग करावा, जेणेकरून आयुष्यात आरोग्याच्या दृष्टीने एक समाधान प्राप्त होईल.” International Yoga Day |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी प्रा. सदानंद मोरे यांचा वारकरी पगडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शाल आणि भक्तियोग स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.… pic.twitter.com/tMee3i3rST
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2025
दुसरीकडे, शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत मरिन ड्राइव्ह या ठिकाणी आयोजित योग सत्रात सहभाग घेतला आणि शेकडो नागरिकांबरोबर योगासनं केली. International Yoga Day |
हेही वाचा:
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाच पाऊल; भाऊबळी फेम प्रसिद्ध अभिनेत्याने संपवलं आयुष्य





