पुणे – एका महिलेला पेटीयम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत, केवायसी अपटेड करण्यास सांगितले. यानंतर दोन ऍप डाऊनलोड करावयास सांगत मोबाईलचा रिमोट ऍक्सेस घेत 99 हजार रुपयांचा ऑन लाईन गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कोटेशनफ्रेड राव दासारी(21,रा.कोरेगाव पार्क) यांच्या आईला एकाने कॉल करत पेटीयम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना तुमचे पेटीयम खाते बंद होणार असून त्यासाठी केवायसी अपडेट करावयाचा बहाणा केला. यानंतर त्यांना टिम व्हूवर आणि क्विक सपोर्ट ऍप डाऊन लोड करण्यास सांगत मोबाईलचा रिमोट ऍक्सेस घेऊन 99 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक बर्गे करत आहेत.