98th Acadamy Awards: नीरज घायवानचा ‘होमबाउंड’ ऑस्कर 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार

98th Acadamy Awards: कोलकात्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर करण्यात आली. यंदा 98वा अकादमी अवॉर्ड होणार असून इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी दिग्दर्शक नीरज घायवानची ‘होमबाउंड’ ही फिल्म भारताकडून पाठवली जाणार आहे.
ही फिल्म धर्मा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बनवली असून यामध्ये विशाल जेठवा, ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत दिसतात. ‘होमबाउंड’ ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष दाद मिळाली होती. तसेच 2025 च्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये या चित्रपटाला इंटरनॅशनल पीपल्स चॉईस अवॉर्डसाठी दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान मिळाला होता.
24 चित्रपटांचा समावेश
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने एकूण 24 भारतीय चित्रपटांची निवड केली असून त्यामध्ये हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नड आणि इतर भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. त्यापैकी ‘होमबाउंड’ हा अधिकृतपणे निवडला गेला आहे.
या यादीतील काही महत्त्वाचे चित्रपट:
आई वॉन्ट टू टॉक (हिंदी)
तन्वी द ग्रेट (हिंदी)
पुष्पा 2 (तेलुगू)
स्थळ (मराठी)
सांबर बोंडा (मराठी)
दशावतार (मराठी)
आता थांबायचं नाय (मराठी)
फुले (हिंदी)
कुबेरा (तेलुगू)
वीर चंद्रहास (कन्नड)
ही निवड भारतीय सिनेमासाठी जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. आता नीरज घायवानचा ‘होमबाउंड’ ऑस्कर 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

