एकाच शाळेतील 9 शिक्षक करोनाबाधित, शाळा बंद

औरंगाबाद – औरंगाबादच्या लाडसावंगी जिल्हा परिषद प्रशालेत सहा शिक्षक आणि तीन शिक्षिकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. एकाच शाळेतील नऊ शिक्षकांना एकदम करोनाची बाधा झाल्यामुळे शाळा लगेच आठवड्याभरासाठी बंद करण्यात आली आहे.
लाडसावंगी जिल्हा परिषद प्रशालेत पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शाळा सुरू होती. शाळेतील तीन शिक्षकांची करोना चाचणी झाली. आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आल्यामुळे या शिक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले. यानंतर शाळेच्या उर्वरित शिक्षकांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत आणखी सहा शिक्षकांना बाधा झाल्याचे आढळले.
शिक्षकांचे उपचार वैद्यकीय देखरेखीत सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने शाळा आठवड्याभरासाठी बंद करण्यात आली आहे. संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची नियमानुसार ठराविक दिवसांच्या अंतराने पुढील काही दिवस सातत्याने तपासणी होईल. या दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचे उपचार लगेच सुरू होतील.
े.




