Tuljapur News : अश्विन पौर्णिमेनिमित्त तुळजापुरात ९ लाख भाविकांचा जनसागर
Tuljapur News : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे भाविकांचा अथांग जनसागर उसळला असून तब्बल ९ लाखांहून अधिक भाविकांनी शहरात हजेरी लावली आहे.

Tuljapur News : सोलापूर ते तीर्थक्षेत्र तुळजापूर- तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी चालत आलेले भाविक घाटशिळच्या दर्शनाने सुखावले असून भाविकांना आता तुळजाभवानी मातेचा दर्शनाची ओढ लागली. दरम्यान, अश्विन पौर्णिमेनिमित्त सोमवारी पाच दिवसांची मंचकी निद्रा संपल्यानंतर पहाटे तुळजाभवानी मातेची सिहांसनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. (Tuljapur News)
अश्विन पोर्णिमेचा वर्षाचा पारंपारिक पायी खेटा पूर्ण करण्यासाठी सोलापूर तसेच नळदुर्ग महामार्गावरून भाविकांचे लोंढे शहरात दाखल झाले होते. सोलापूर मार्गे येणारे भाविक घाटशिळ भक्ती मार्ग – पायर्यांवरून शहरात दाखल झाले. तत्पूर्वी घाटशिळचे दर्शन घेत घाटशिळ पायर्यांवर विसावा घेतला. (Tuljapur News)
दरम्यान सोमवारी दुपारनंतर भाविकांचा गर्दीत वाढ झाली. घाटशिळ रोड तसेच नळदुर्ग रोड वरून भाविकांचे लोंढे शहरात दाखल होत होते. सोमवारी दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाचा मानाच्या काठ्यांचे बारालिंग मार्गे शहरात आगमन झाले. (Tuljapur News)
दुपारी सचिन पाटील यांच्या वाड्यात काठ्या विसावल्या .तर रात्री उशिरा सोलापूरच्या मानाच्या काठ्यासह छबिना मिरवणुक काढण्यात आली. (Tuljapur News)
Tuljapur News : तुळजापूर-नळदुर्ग रोडवर एसटी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण





