… तर आम्ही जीवंत दिसलो नसतो
गंगानगर भागात आम्ही 35 वर्ष रहात आहोत. आम्हाल कधीच यापुर्वी समस्या आली नाही. मौजपूर आणि बाबारपूरमध्ये हिंसाचार सोमवारी आणि मंगळवारी पसरला. त्यातून आमच्या भागात तशा काही घटना घडल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे आमच्या घरावर हल्ले झाले. आम्ही पोलिसांना मदतीसाठी बोलावले. पोलिस आले नसते तर आम्ही आज जीवंत नसतो.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगल आटोक्यात आणण्यात अपयश येत असल्या बद्दल टीका होत असताना गोकूळपुरी भागातील 80 कुटुंबे मात्र पोलिसांना धन्यवाद देत आहेत.
त्याचं झालं असं, गोकूळपुरीतील गंगानगर वसाहतीवर सोमवारी आणि मंगळवारी समाजकंटकांच्या गटाने हल्ला केला. मात्र त्यावेळी पोलिस तेथे वेळेत पोहोचले. त्यामुळे समाज कंटक परागंदा झाले. पोलिसांनी या कुटुंबांना तेथून हलवून दयालपूर पोलिस ठाण्यात नेले.
पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी आणलेल्या कुटुंबातील एकाने सांगितले, गंगानगर भागात आम्ही 35 वर्ष रहात आहोत. आम्हाल कधीच यापुर्वी समस्या आली नाही. मौजपूर आणि बाबारपूरमध्ये हिंसाचार सोमवारी आणि मंगळवारी पसरला. त्यातून आमच्या भागात तशा काही घटना घडल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे आमच्या घरावर हल्ले झाले. आम्ही पोलिसांना मदतीसाठी बोलावले. पोलिस आले नसते तर आम्ही आज जीवंत नसतो.
पोलिस ठाण्यात सुमारे 100 जणांना ठेवण्यात आले. तर अन्य काही जणांनी आपल्या पाहुण्यांकडे मुक्काम केला. आपल्या भावाच्या कुटुंबाला घेऊन जाण्यासाठी गझियाबादहून आलेला एक जण म्हणाला, आम्हाला परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. मात्र तशी सुधारणा झाली नाही. आमच्या नातेवाईकांना वाचवल्याबद्दल आम्ही दिल्ली पोलिसांचे आभारी आहोत
हलवलेल्या नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आले. मात्र ज्यांच्याकडे अशी सोय नाही. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.





