Triptii Dimri : बॅालीवूड इंडस्ट्रीत येण्यासाठी नवोदित कलाकारांना मोठ्या स्ट्रगलचा सामना करावा लागतो. त्यातही यश कधी मिळेल याची श्वास्वती नाही. सध्याच्या घडीला बॅालीवूड इंडस्ट्रीत अभिनेत्री तृप्ती डिमरीचा बोलबाला आहे. तिला लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि आपले अढळ स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यासाठी तब्बल ८ वर्ष संघर्ष करावा लागला. दरम्यानच्या काळत तिने अनेक चित्रपटात काम केले. पण जास्त कुठे चर्चा झाली आहे. अशातच ती अॅनिमल चित्रपटात झळकली आणि रातोरात स्टार बनली. इथेपर्यंत पोहचण्यासाठी तृप्तीने मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. तृप्ती डिमरीचा जन्म २३ फेब्रुवारी १९९४ रोजी उत्तराखंडमध्ये झाला. दिनेश डिमरी आणि मीनाक्षी डिमरी असे तिच्या आई वडिलांचे नाव आहे. तिचे वडील एअर इंडियामध्ये नोकरी करत होते. त्यामुळे कुटुंबाला दिल्लीला स्थलांतरित व्हावे लागले. तृप्तीचे वडील देखील रामलीला कलाकार होते आणि दरवर्षी १० दिवसांच्या रामलीला आणि दसरा उत्सवाचे आयोजन करत असायचे. त्यामुळे लहानपणापासूनच तृप्तीला घरातील कलात्मक आणि सांस्कृतिक वातावरणाचा अनुभव आला, ज्यामुळे चित्रपट क्षेत्रात तिची यशस्वी कारकीर्द घडली. तृप्तीने दिल्लीतील श्री अरबिंदो कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. दरम्यान, तिने मॉडेलिंग सुरू केले. एका एजन्सीने तिला ऑडिशनसाठी आमंत्रित केले आणि तिची निवड केली. तिने संतूर साबणाच्या जाहिरातीद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. तृप्ती डिमरीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अभिनेत्री श्रीदेवीच्या शेवटच्या “मॉम” या चित्रपटामधून केली. त्यात तिने विद्यार्थिनीची एक छोटीशी भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ती २०१८ मध्ये आलेल्या “पोस्टर बॉय” चित्रपटात दिसली. पण तिला स्वतःची ओळख तयार करण्यासाठी पाच वर्ष संघर्ष करावा लागला. २०२३ मध्ये आलेल्या “अॅनिमल” या चित्रपटाने तिच्या करिअरला यशाची मोहर लावली. आता तृप्ती बॅालीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तृप्ती रडली. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या “लैला मजनू” या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तृप्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिला काश्मीरच्या खोऱ्यात २० तास शूटिंग करावे लागले. तिने एका मुलाखतीत सांगितले की, “त्या काळात, मी अनेकदा रडू लागायचो, मी काय करत आहे याचा विचार करत असे. काहीही सोपे नव्हते. आम्ही स्थानिक लोकांच्या घरी जायचो आणि तिथे जेवायचो.” हेही वाचा : Top 10 news: आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, ‘VIROSH’ नं दिली प्रेमाची कबुली, जाणून घ्या अशा टॉप १० बातम्या