छत्तीसगडमध्ये चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा
Updated On:

बिजापूर – छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाने ८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात कमलेश नीलकंठ याचा समावेश असून त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षिस होते.
ही चकमक शनिवारी गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात झाली. यावेळी सुरक्षा कर्मचा-यांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. सध्या घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या गोळीबारात राज्य पोलिसांच्या एका तुकडीचे दोन जवानही जखमी झाले.





