Big Accident : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू
Updated On:

सिद्धार्थनगर – लग्नाच्या मिरवणुकीने भरलेली बोलेरो शनिवारी मध्यरात्री सिद्धार्थनगर जोगिया पोलीस स्टेशन हद्दीतील काट्या गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. यात भीषण अपघातात आठ जण ठार, तर तीन जखमी झाले आहेत.
मृतांपैकी सात जण शोहरातगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महला गावातील आणि एक चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खमहरिया गावातील रहिवाशी आहे. हे सर्व बन्सी कोतवाली भागातील महुवा गावातून लग्नाच्या वरातीतून घरी परतत होते. पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.




