खेड-शिवापूर टोल नाक्यावर 8 किलो गांजा पकडला; राजगड पोलिसांची कारवाई

खेड शिवापूर – खेड शिवापुर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी संशयादस्पद कार थांबवून गांजा पकडला असून कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले आहे. खेड शिवापुर टोलनाका (ता. हवेली) येथील पुणे बाजूकडून येणारी भरधाव कार (एच आर 51 बि. सी. 2424) ही सातारा बाजूकडे जात असताना राजगड पोलिसांचे वाहतूक विभाग नियत्रंणचे पोलीस हवालदार सचिन कदम, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्होवाळ, अमोल सूर्यवंशी, होमगार्ड पंकज शिंदे यांनी संशयित कार थांबविली. कारची तपासणी केली असता मागील डिकीत गांजा आढळला. गांजासह गाडी असा एकूण ४,८१,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी ईस्माईल बाबु सय्यद (वय ३० वर्ष), सैफाली शब्बीर सुतार (वय २३ वर्ष), जैनुल गजबार मुल्ला (वय ३५), जिआउल रेहमान रियाज मुजावर, (वय २०, चौघेही ता. हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक), आजु अजगर अल्ली खान, (वय २१, रा. माणखुर्द, मुंबई) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोलनाका येथे सोमवार (दि. १६) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गांजा पडकलेली कार व आरोपींना घेऊन खेडशिवापूर चौकीत आणण्यात आले असून पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हे आरोपीची कसून चौकशी करत आहे.
नाकाबंदी करीत असताना प्राप्त माहीतीतील वर्णनाची हुंदाई वेरना गाडी थांबवून चौकशी केली असता गाडीच्या डीग्गीत ८१,९७० रुपये किमंतीचा ८ किलो गांजा सदर गाडीतुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला आहे. तसेच हुंडाई वेरना गाडी असा एकूण ४,८१,९७० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.





