Jagdish Singh Patani : ८-१० राऊंड्स फायर झाले अन्…; दिशा पटानीच्या वडिलांनी सांगितला घटनेचा थरार, म्हणाले “हे योगीजींचे राज्य त्यामुळे…”

Jagdish Singh Patani : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या उत्तर प्रदेशमधील बरेलीतील सिव्हिल लाईन्स येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे.
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आधात्मिक गुरू आणि धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ दिशा पटानीची बहिण खुशबू हिने पोस्ट केला होता. त्यावरून घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आता दिशा आणि खुशबू यांचे वडिल जगदिश सिंह पटानी यांनी एनआयला दिलेल्या मुलाखतीत घटनेचा थरार सांगितला आहे.
कसंबसं फायरिंगपासून वाचलो
दोन अज्ञात व्यक्तींनी आमच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हे विदेशी गन होते. ८-१० राऊंड्स फायर झाले आहेत. फायरिंग झाल्यानंतर आम्ही सर्वच दहशतीत होतो. झोपेतून जागे झालो. बाहेर यायचा प्रयत्न केला पण कसंबसं फायरिंगपासून वाचलो, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच गोल्डी ब्रारने हल्ल्याची जबाबदारी घेतली असली तरी अजून सिद्ध झालेलं नाही. त्याने फक्त सोशल मीडियावरुन सांगितलं आहे आणि मी याला गांभीर्याने घेत नाही. कारण संविधानात आपलं म्हणण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. अशा प्रकारचा हल्ला झाल्यानंतर सध्या याबद्दल काहीच स्पष्ट सांगता येत नाही, असंही जगदिशसिंह पटानी म्हणाले.
योगीजींचा प्रदेश आहे. ते नक्कीच…
ज्या वक्तव्यामुळे गोळीबार करण्यात आला, त्यावर बोलताना खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आलं. आम्ही सनातनी आहे आणि आम्ही सर्व साधूसंतांचा सम्मान करतो. पण खुशबूचं वक्तव्य मोडून तोडून दाखवण्यात आल्याने आमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला आहे, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. योगीजींचा प्रदेश आहे. ते नक्कीच अशा प्रकारच्या गुंडागर्दीवर लगाम लावतील.
हेही वाचा : CM फडणवीसांच्या त्या आदेशामुळे भाई नाराज? चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?





