7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच 4% वाढणार!
Updated On:

7th Pay Commission: केंद्र सरकार लवकरच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा करू शकते. वृत्तानुसार, यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 3-4 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. डीएमधील ही वाढ 1 जुलै 2024 पासून प्रभावी मानली जाईल. गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता.
मार्च 2024 मधील शेवटच्या डीए वाढीदरम्यान, सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवून मूळ वेतनाच्या 50 टक्के केला होता. तसेच, पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) देखील 4 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. जानेवारी आणि जुलैपासून प्रभावी होतो. डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना, तर DR पेन्शनधारकांना दिला जातो.





