देशांत दिवसामध्ये 76 हजार बाधित

नवी दिल्ली – देशांत शनिवारी 76 हजार 472 करोनाबाधित आढळले. गेल्या दोन दिवसांपेक्षा ही संख्या कमी असली तरी जगात सर्वाधिक आहे.
ही साथ सुरू झाल्यापासून देशात 34 लाख 60 हजार बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाबधितांच्या संख्येत इटली आणि ब्राझीलपाठोपाठ भारताचा क्रमांक लागत आहे. गेले दोन आठवडे भारतात या दोन देशांपेक्षा अधिक बाधित सापडत आहेत.
देशांत गेल्या 24 तासांत करोनामुळे एक हजार 21 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना बळींची संख्या 62 हजार 550 वर पोहोचली. त्यातच पुढील आठवड्यापासून देशांतर्गत प्रवासाचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.
सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शहराला पूर्वपदावर आणण्याची गरज व्यक्त केली आहे. मुंबईत 331 जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. हा एका दिवसांतील मृतांचा उच्चांक आहे.





