पुणे जिल्हा | ओतूरमध्ये ७३ म्हैशी ताब्यात

ओतूर, (वार्ताहर)- ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुबी येथे नाकाबंदी केली असता मुंबईकडे जाणाऱ्या ५ ट्रकमधील अवैध लहान मोठे ७३ म्हैस आढळून आली. २ मृत जनावरे असे एकूण ६० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
मोहम्मद वकील इकरार खान (उत्तर प्रदेश), तोहीत कुरेशी, मोहम्मद बिलाल भाई मिया शेख (दोघेही रा. शिवाजीनगर मुंबई), उस्मान खान रमजान खान (मुंबई), रशीद अब्दुल रहीम शेख (मुंबई), फिरोज मलिक (उत्तर प्रदेश), फारूक कुरेशी (रा. फलटण), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बकरी ईदच्या अनुषंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी घेऊन जात होते. एकूण ७१ जनावरे यांची देखभालीसाठी श्री जीवदया मंडळ गोशाला संगमनेर अहमदनगर येथे जमा करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहू चाटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर, अजित पाटील, कॉन्स्टेबल ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, श्याम सुंदर, जायभाय विश्वास केदार, पोलीस हवालदार धनंजय पालवे, महेश पठारे, सहाय्यक फौजदार महेश कुमार झनकर, पोलीस नाईक भरत सूर्यवंशी, हवालदार दिनेश साबळे यांनी केली.




