पिंपरी | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार ७२ कोटींचे रस्ते

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ संशोधन व विकास अंतर्गत मावळ तालुक्यात सुमारे ७२ कोटी ३८ लाख रुपये खर्चून १० रस्ते विकसित करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ संशोधन व विकास अंतर्गत मावळ तालुक्यातील सुमारे ७२ कोटी ३८ लक्ष निधीतील विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून हा निधी आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल आमदार शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
रस्ते विकास कामाचे नाव आणि उपलब्ध निधी :
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली रस्ते व त्यासाठीचा मंजूर खर्च पुढील प्रमाणे आहे.
कोथुर्णे ते वाघजाई वस्ती ते मळवंडी ठूले रस्ता – ८ कोटी ३८ लक्ष
राममा-०४ – वळक ते सांगिसे रस्ता – १० कोटी ४ लक्ष
इजिमा-६५ ते करंजगाव पाले ना. मा. उकसान रस्ता -१० कोटी ७१ लक्ष
इजिमा-६८ ते राजपुरी ते मंगरूळ रस्ता -६ कोटी ७० लक्ष
चांदखेड ते कासारसाई रस्ता -७ कोटी ६९ लक्ष
मळवली ते सदापुर ते राममा -०४ रस्ता.-९ कोटी २३ लक्ष
वाघेश्वर कादव ते ग्रामा-२८ चोरघेवस्ती ते शिंदेवस्ती रस्ता – ७ कोटी ५० लक्ष
प्रजिमा-१५७ ते चांदखेड रस्ता -५ कोटी २० लक्ष
इजिमा-६५ ते करंजगाव ते वादरमाळ रस्ता – ३ कोटी २९ लक्ष
प्रजिमा-२६ काले कॉलनी ते दत्तवाडी-ढालेवाडी ते मालेवाडी रस्ता – ३ कोटी ५९ लक्ष





