प्रयागराजमधील ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्णांचा ४८ तासांमध्ये मृत्यू – प्रियांका गांधींचा आरोप

लखनौ – उत्तर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी आपली भूमिका ट्विटद्वारे मांडली असून त्या म्हणतात, “जवळपास 3 महिन्यांचे लॉक डाऊन व यूपी सरकारच्या मोठ-मोठ्या दाव्यांनंतर देखील राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झालाय. राज्यातील रुग्ण वाढीचे प्रमाण ३ जिल्ह्यांमध्ये २००%, ३ जिल्ह्यांमध्ये ४००% तर एका जिल्ह्यात चक्क १०००% इतके वाढले आहे.”

आणखी एका ट्विटमध्ये त्या म्हणतात, “एका वृत्तानुसार प्रयागराजमध्ये कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढील ४८ तासांमध्येच ७०% कोरोना रुग्ण मृत पावत आहेत. आम्हाला याचीच भीती होती. यामुळेच आम्ही मुख्यमंत्री महोदयांना पत्रदवारे टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला दिला होता.”

“आज उत्तर प्रदेशातील कोरोनाचे संकट गंभीर होण्यामागे तोकड्या चाचण्या, बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न करणे, चाचण्यांचे अहवाल देण्यास उशीर करणे, आकडे लपवणे या बाबी कारणीभूत असून युपी सरकारकडे याबाबत काहीही उत्तर नाही.” असा आरोपही त्यांनी लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.