पुणे | राज्यात ७० नवीन अंगणवाडी केंद्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानांतर्गत राज्यात ७० नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांच्या बांधकामासाठी १२ लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे.
प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी १ प्रमाणे पदभरती करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समरुप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिश्याच्या संबंधित अनुदानातून अंगणवाडी केंद्रांकरिता पूरक पोषण आहार.
प्रशासकिय खर्च, गणवेश, अंगणवाडी भाडे या बाबींकरिता केंद्र व राज्य हिश्याचे प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपध्दतीनुसार येणारा खर्च भागवावालागणार आहे. याबाबतच्या सूचना राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.





