भीषण अपघात: वाळूच्या ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
Updated On:

नेल्लोर – आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात ट्रक आणि कारमध्ये आज भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील सात जणांना जागीच आपला जीव गमवावा लागला. हे सर्व मृत नेल्लोर शहरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील संगम मंडलजवळ वाळूने भरलेला ट्रकने कारला जोरदार धडक दिली.
यात एकाच कुटुंबातील १५ वर्षीय मुलीसह सात जणांचा मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की, वाहन लॉरीखाली चिरडले गेल्यामुळे मृतदेह ओळख पटवणेही कठीण झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.





