Nagar : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ६ कोटी वर्ग

संगमनेर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत 18 हजार 274 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 5 कोटी 96 लाख 65 हजार 900 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर बुधवारी वर्ग होत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण 6280 लाभार्थ्याना 2 कोटी 61 लाख 74 हजार 400 रुपये , ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती 617 लाभार्थ्याना 18 लाख 33 हजार 900 रुपये, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती 259 लाभार्थ्यांना 7 लाख 71 हजार रुपये, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्व साधारण 5676 लाभार्थ्यांना 1 कोटी 65 लाख 72 हजार रुपये , ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर 2024 चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अनुसूचित जाती 681 लाभार्थ्यांना 20 लाख 43 हजार रुपये, ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती 322 लाभार्थ्यांना 9 लाख 66 हजार रुपये. ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2024 चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 4439 लाभार्थ्यांना 1 कोटी 13 लाख 5 हजार 600 रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आज सायंकाळीपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होत आहे, परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थोडा कालावधी लागला आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. ज्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
– अमोल खताळ, आमदार.





