Pooja Hegde movie : दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यांच्या मेगा बजेट मोहजो दारो या चित्रपटातून अभिनेत्री पूजा हेगडे हिने बॅालीवूडमध्ये पदार्पण केले. पूजाचा पदार्पणातील पहिलाच चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. त्यानंतर तिने अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये अभिनय केला. मात्र, त्यातील बरेच चित्रपट फ्लॅाप ठरले. आता पूजा हेगडे तिच्या आगामी है जवानी तो इश्क होना है या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. मात्र, या चित्रपटाची कोणतीही नवी अपडेट समोर आलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता शाहिद कपूर आणि पूजा हेगडे हिची मुख्य भूमिका असलेला देवा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फ्लॅाप ठरला. यामुळे पूजाचा हिंदीतील सलग सहावा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. यामुळे पूजा हेगडेच फिल्मी करिअर धोक्यात आल्याची चर्चा केली जात आहे. या वर्षी हिंदी आणि आता तमिळमध्ये सलग दोन फ्लॉप चित्रपट देणारी अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या नवीन हिंदी चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात दिसणार का याबद्दल साशंकात व्यक्त केली जात आहे. ‘रेट्रो’ चित्रपटानंतर, तिच्याकडे ‘जाना नायकन’ हा चित्रपट आहे, जो तिचा सह-कलाकार विजयचा तमिळमधील शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय पूजाकडे कंचना ४ हा चित्रपट देखील आहे. पूजा हेगडेचे नाव असलेले बरेच मेगा बजेट हिंदी चित्रपट आहेत, त्यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर निर्विवादपणे हिट ठरू शकलेला नाही. पूजाची बॅालीवडूमध्ये मोहजोदारो चित्रपटातून एन्ट्री झाली. यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपट केले. सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातही पूजा दिसली होती. तसेच नुकताच या वर्षी प्रदर्शित झालेल्या देवा चित्रपटात तिने अभिनय केला होता. यापैकी कोणत्याही चित्रपटाला फार चांगले यश बॅाक्स अॅाफिसवर मिळू शकलेले नाही. यामुळे दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या है जवानी तो इश्क होना है या चित्रपटातून पूजा काही कमाल करू शकणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.