पणदरे पवईमाळ वस्तीवरील 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू ; बारामतीत कोरोनाचा पाचवा बळी
Updated On:

बारामती : पणदरे (ता. बारामती) येथील पवईमाळ वस्तीवरील कोरोना संक्रमित 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील पणदरे येथील पवईमाळ येथे एका महिलेस कोरोनाची लागण झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले होते. काल एकूण 38 स्वॅब नमुने घेतले होते. त्यापैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले असून पवईमाळ येथील एक 55 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे.
या महिलेला त्रास होत असल्यामुळे महिलेस गुरुवारी खाजगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालय रूई येथे आणण्यात आले होते. आज श्र्वसनाचा त्रास वाढल्यामुळे सदर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले.





