53 वा बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा साजरा
Updated On:

बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा सालाबादप्रमाणे 26 जून रोजी संपन्न करण्यात आला. सध्या करोना प्रादुर्भाव असल्यामुळे यंदाचा वर्धापनदिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बालगंधर्व यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व केक कापून हा वर्धापनदिन साजरा केला.
या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते.








