Monorail : मोनोरेलमधील 50 प्रवाशांना अचानक खाली उतरवले; आचार्य अत्रेनगर स्थानकाजवळ नेमकं काय घडलं?

Monorail : १९ अॅागस्टच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास चेंबर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरून धावणाऱ्या दोन मोनोरेल बंद पडल्या. यापैकी एका मोनोरेल गाडीतील प्रवाशांना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. या घटनेनंतर मोनोरेलची सुरक्षितेचा प्रश्न ऐरवणीवर आला होता. पण या मोनोरेलमध्ये प्रवासी संख्या जास्त होती आणि त्यामुळे अधिक भार सहन न झाल्याने तसेच तांत्रिक कारणामुळे मोनोरेल बंदी पडली होती.
आता पुन्हा एकदा २१ अॅागस्ट रोजी अतिभारामुळे मोनोरेल आचार्य अत्रेनगर स्थानकात थांबवून प्रवाशांना खाली उतरवून पुन्हा मोनोरेल सुरू करण्यात आली. यासाठी १५ मिनिटे लागली. गाडी सुरू होण्याच्या अगोदर 50 प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा मोनोरेलचा प्रवास सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे. मंगळवारच्या घटनेत मोनोरेलमध्ये जास्त प्रवासी बसल्यामुळे एका बाजूला गाडी झुकली होती. त्यामुळे पूर्ण सेवा रात्री विस्कळित झाली होती. आता पुन्हा एकदा गुरूवारी सकाळी सव्वा नऊ साडेनऊच्या सुमारास सुमारे १०९ टन वजन घेऊन अँटॉप हिल्स जवळीत आचार्य अत्रेनगर स्थानकात जवळपास पंधरा मिनिटे मोनोरेल रखडली होती. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
त्या घटनेच्या दिवशी प्रवासी संख्या अधिक होती
या दोन्ही घटनांची गंभीर दखल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एमएमआरडीएने घेतली आहे. तीन दिवसांत या घटनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मेट्रो संचलन मंहामंडळ संचालकांना दिले आहेत. मोनोरेल ही आकारने लहान आहे, या रेल्वेसेवत साधारणपणे 500 ते 520 प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतात, पण १९ अॅागस्ट या दिवशी या मोनोरेलमध्ये 582 प्रवासी प्रवास करत होते.
मोनोरेलमध्ये अतिभार झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे वळणावर मोनोरले एका बाजूला झुकली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने या मनोरेलमधूनच आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यानंतर प्रवाशांनी आपली आपभिती व्यक्त केली होती.
हेही वाचा : Indian Currency Notes : खिशातील नोटांमुळे ‘या’ गंभीर आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक खुलासा





