पुणे जिल्हा | महायुतीच्या 48 पैकी 50-60 जागा निवडून येतील
Updated On:

वाघोली, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीच्या 48 नाही, तर 50-60 जागा निवडून येतील अशी मिश्किल टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाघोली येथे केली.
वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले असता ते बोलत होते. दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने जनतेत आक्रोश आहे.
अधिकार्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येची जाण असते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही तर देशात मोदी हारेल बघत राहा असे देखील मिश्किल पणे सांगितले.





