वर्ल्ड बेस्ट स्कूलमध्ये भारतातील 5 शाळा ! महाराष्ट्रातील 3 तर दिल्ली गुजरातमधील प्रत्येकी 1 शाळेचा समावेश

नवी दिल्ली – जगातील सर्वोत्तम शाळांच्या यादीत भारतातील 5 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळा निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील पाच शाळांनी स्थान पटकावले आहे. यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली आणि गुजरातमधील शाळांचा समावेश आहे. वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये करण्यात आले आहे.
या पुरस्कारातून प्रत्येक कॅटेगरीतील टॉप 3 शाळांची घोषणा करण्यात येणार आहे. ही घोषणा सप्टेंबरमध्ये होणार आहे. यानंतर विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे. तसेच पाच कॅटेगरींना पाच पुरस्कार मिळणार आहेत. यावेळी बक्षीसाच्या स्वरूपात प्रत्येक शाळेला 50 हजार डॉलर्स मिळणार आहेत.
भारतातील शाळांमध्ये दिल्लीची सरकारी शाळा नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय एफ-ब्लॉक, दिलशाद कॉलोनी आहे. त्याच कॅटेगरीमध्ये मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशन स्कूल आहे. तर तिसरी शाळा ही गुजरातच्या अहमदाबादची रिव्हरसाईड स्कूल आहे.
महाराष्ट्रातून आणखी दोन शाळा आहेत. यापैकी एक शाळा ही अहमदनगर जिल्ह्यातील आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल हे एचआयव्ही, एड्सग्रस्त आणि सेक्स वर्करांच्या कुटुंबातील मुलांना शिकवते. पाचवी शाळा ही मुंबईतील आकांक्षा फाउंडेशनची शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल आहे.

